असा येतो उन्हाळा...!


असाच रेंगाळत होतो खिडकीपाशी
आणि क्षणार्धात स्मुर्तीविलोप झाला
काय विसरलो हे कळण्याआधीच
तुझ्या आठवणींचा पाऊस आला

पावसाची सर आता नुकतीच बरसली
आणि तुझ्या आठवणींची पाऊलवाट
पुन्हा एकदा हिरवळली

गंध फुटला त्या आठवणींना
त्यात माझं मन थरारल
हातातली कॉफी तशीच राहिली
पण अंग मात्र शहारल

ओघळणाऱ्या त्या प्रत्येक थेंबाने
आता तुझेच चित्र रेखाटेले
आणि बघता बघता सर्वत्र
तुझ्याच आठवणींचे मेघ दाटले

भवनारुपी त्या मेघांनी
मला आता साद घातली
आणि तुझ्या लखलखत्या केसांची
एक शुभ्र पांढरी लट त्यातून डोकावली

मी सुद्धा नेहीप्रमाणे
ती दुरूनच पहिली
अणि तो गंध, ती भावना, ते इशारे
माझ्यासाठी नाही...असं म्हणत
उन्हाळ्याची कविता गायली...!
     
                               - निशांत देवेकरर

Comments